Saturday 24 December 2011
असेच कायम वागायाचे
असेच कायम, वागायाचे, ठरवलेस ना?
असेच मजला, टाळायाचे, ठरवलेस ना?
हरकत नाही, अता यापुढे, नकोस बोलू
फोन कधी ना, उचलायाचे, ठरवलेस ना?
नशा जराशी, केल्यावर मी, नूर तुझा हा
मनास कायम, रिझवायाचे, ठरवलेस ना?
दोन क्षणांची , नातीगोती, सरेल जीवन
परस्परांना, फुलवायाचे, ठरवलेस ना?
तुझ्या मनासारखा वागलो, म्हणजे मोठा
नाद खुळा हा, टाळायाचे, ठरवलेस ना?
नकोस बोलू, पिंग करुनी, अता या पुढे
जे जे तुजला , ठरवायाचे, ठरवलेस ना?
सोडुन दे रे!, नको ’अगस्ती’, दु:खी होऊ
झाले गेले, विसरायाचे, ठरवलेस ना?
--- अगस्ती
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment