आता शर्यत, हरतो आहे
अजून पण मी, पळतो आहे
फोलपणा समजला तरीही
आयुष्याला भिडतो आहे
खरे बोललो... लोक भडकले
म्हणे त्यांस मी, नडतो आहे
तुझ्याचसाठी जगतो आहे
तुझीच स्वप्ने, बघतो आहे
कोसळतांना, स्वत: इथे मी
तुला मात्र सावरतो आहे
किती लाजली, " हो " म्हणतांना
पुन्हा तेच आठवतो आहे
दुनियेने टाळले " अगस्ती"
तिला मात्र आवडतो आहे
--- धोंडोपंत
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment