हजारदा सांगितले तुजला.. "नकोस पिंगू"
सांगुन सांगुन, थकलो पण तुज, समजत नाही
तुझा रिकामा, वरचा मजला, नकोस पिंगू
स्टेट्स माझा, "बीझी" असता, हट्ट तुझा की
"मला ’अगस्ती’, ऐकव ग़ज़ला"... नकोस पिंगू
येता जाता, पत्नी येथे, पहात असते
रोजच येतो, संशय तिजला, नकोस पिंगू
रोजच येतो, संशय तिजला, नकोस पिंगू
"टाळायाचे, असेल मज तर, टाळ ’अगस्ती’ "
"आजपासुनी, तू ही मजला... नकोस पिंगू"
0 comments:
Post a Comment