मी तर सावज, तूच शिकारी, अचूक धरशी, नेम सखे
एक नजर, पडताच तुझी ती, होतो माझा, गेम सखे
एक नजर, पडताच तुझी ती, होतो माझा, गेम सखे
सदैव कामे, तुला आणखी, सदैव प्रॉब्लेम, तुझे नवे
टाळण्यास मज, तू जे देसी, ते तर एक्सक्युज, 'लेम' सखे
टाळण्यास मज, तू जे देसी, ते तर एक्सक्युज, 'लेम' सखे
एक फोनही, कधीतरी अन्, भेटतेसही, कधीतरी
समजावे मी, कसे तुझे की, आहे मजवर, प्रेम सखे?
समजावे मी, कसे तुझे की, आहे मजवर, प्रेम सखे?
पैसा अडका, इमला गाडी, मला न त्याची, आसक्ती
दौलत माझी, तूच सखे गं, तूच खरोखर, हेम सखे
दौलत माझी, तूच सखे गं, तूच खरोखर, हेम सखे
कोहिनूर वा, असो कुणीही, मला न कौतुक, त्याचेही
तुझ्यारुपाने, मला लाभला, अमूल्य किमती, 'जेम' सखे
तुझ्यारुपाने, मला लाभला, अमूल्य किमती, 'जेम' सखे
तुला भेटण्या, नको अडथळा, म्हणून केला, खर्च किती?
नवीन आला, कॉम्प्युटर हा, नवीन बघ मॉडेम सखे
नवीन आला, कॉम्प्युटर हा, नवीन बघ मॉडेम सखे
नको दुरावा, नको अबोला, नकोस अंतर, देऊ तू
कोण चालवी, तुझ्यावाचुनी, माझा योगक्षेम सखे?
कोण चालवी, तुझ्यावाचुनी, माझा योगक्षेम सखे?
आपला,
(काव्यात्मक) धोंडोपंत
(काव्यात्मक) धोंडोपंत
5 comments:
va! mast gazal! maja ali vachun!
vruttabaddalchya oli manapasun bhavlya.
दौलत माझी, तूच सखे गं, तूच खरोखर, हेम सखे
व्वा !
सुरेख जमलयं हे यमक अन् ही गझलदेखील.
Namaskaar,
Aaj 03 December 2009, roji tumchaa dhondopant.blogspot.com haa blog baghtilaa. Tasa dar update laach tumche donhi blogs follow karat asto. Kaaran faarach aprateem aahet, khup shikaayla milta.
Aaj dhodopant.blogspot
war " Dnyaniyaancha waa Tukyaacha haacha majha Dharma ..."
hyaa oli waachlyaa.
Khaali tumhi - Suresh Bhat asey lihile aahe.
Malaa waatata ki hya Ga.Di.Ma hyaachya oli aahet, Puriya hya kavya sangrahaatlya.
Dhanyawad, Kshamaswa
- Anubandh
पंत,
क्षमा करा, पण तुमची ही कविता पुढे पाठवण्याचा मोह होतोय .. आणि मी ती (हो तुमच्या नावासह) फॉर्वर्ड करतोय !!
एक नंबर !!
best.
Post a Comment